सलमान खानला धमकी देणारा अडकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलमान खानला धमकी देणारा अडकेत
सलमान खानला धमकी देणारा अडकेत

सलमान खानला धमकी देणारा अडकेत

sakal_logo
By

किन्हवली, ता. १५ (बातमीदार) : प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला ठार मारू, असा मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन करणाऱ्या अल्पवयीन मुलास मुंबई पोलिसांनी शहापूर तालुक्यातील डोळखांब येथून ताब्यात घेतले आहे. अभिनेता सलमान खानला येत्या ३० एप्रिलपर्यंत ठार मारणार असून त्याला जाऊन सांगा आपले नाव रॉकीभाई गौशाला रक्षक असून जोधपूर राजस्थान येथून बोलत आहे, असा दूरध्वनी संदेश सोमवारी रात्री मुंबई पोलिस मुख्य नियंत्रण कक्षाला मिळताच त्यांनी तातडीने दखल घेत तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे शहापूर तालुक्यातील डोळखांब बाजारपेठे गाठली. या वेळी पोलिस कोणाचा तरी शोध घेत असल्याचा संशय आल्याने पळ काढत असणाऱ्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता आपणच धमकीचा फोन केला असल्याची कबुली त्याने दिली. हा अल्पवयीन आरोपी येथील एका सोने-चांदी विक्रीच्या दुकानात काम करत असल्याचे समजते. मुंबई येथील आझादनगर पोलिस याबाबत घटनेचा अधिक तपास करत आहेत.