ठाण्यात आगीचे सत्र सुरूच

ठाण्यात आगीचे सत्र सुरूच

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : मागील चोवीस तासांत ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लहान-मोठ्या अशा आगीच्‍या सहा घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीच्या घटनांची माहिती मिळताच ठाणे पालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष या विभागांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आर मॉलमागे, मानपाडा येथील कल्पतरू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मे. श्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंपनीच्या साहित्याला आग लागली. ही आग तासाभराने नियंत्रणात आली. शुक्रवारी रात्री ११.५५ च्या सुमारास पातलीपाडा पुलाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये आग लागली. याचदरम्यान शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिवा स्टेशन रोड या ठिकाणी असलेल्या मोरेश्वर बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावरील रूममध्ये ठेवलेल्या पीव्हीसी पाईपच्या सामानाला किरकोळ आग लागली. दिवा येथे शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास इलेक्ट्रिक तसेच घरगुती प्लास्टिकला आग लागली होती; तर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास यशोधन नगर येथे झाडाच्या फांद्या महावितरणच्या विद्युत केबलला लागल्यामुळे घर्षणाने शॉर्टसर्किट होत होते; तर घोडबंदर रोड येथील ऋतू इस्टेट कॉम्प्लेक्सच्‍या बाजूलाच असलेल्या मोकळ्या जागेतील गवत आणि कचऱ्याला तसेच सुकलेल्या झाडांच्या ओंडक्यांना आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास समोर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com