हद्दपार गुन्हेगार कापुरबावडी पोलिसांच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दपार गुन्हेगार कापुरबावडी पोलिसांच्या जाळ्यात
हद्दपार गुन्हेगार कापुरबावडी पोलिसांच्या जाळ्यात

हद्दपार गुन्हेगार कापुरबावडी पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (वार्ताहर) : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी परिमंडळ-५ चे पोलिस उपायुक्त यांनी आरोपी रूपेश लक्ष्मण गायकवाड (वय २४) याला दोन वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते; मात्र पोलिस आदेशाचे उल्लंघन करत कापूरबावडी परिसरात लपून वास्तव्य करणाऱ्या आरोपी गायकवाड याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. आरोपी रूपेश गायकवाड यांच्या गुन्हेगारीचा आलेख पाहून पोलिस उपायुक्त परिमंडळ- ५ यांनी २७ जानेवारी २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते. रूपेश हा मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड व ठाणे या महसुली जिल्ह्यांतून हद्दपार आहे. दरम्यान कापूरबावडी पोलिस गस्तीवर असतानाच आरोपी गायकवाड आझादनगर परिसरात वास्तव्य करताना शुक्रवारी (ता. १४) आढळला. दरम्यान कापूरबावडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.