शेतकऱ्यांची तोडलेली घरे पुन्हा बांधून देणार

शेतकऱ्यांची तोडलेली घरे पुन्हा बांधून देणार

विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयावर वनविभागाच्या जुलमी कारवाईच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वन विभागातील अधिकाऱ्यांनी १५० शेतकऱ्यांच्या घरांवर नोटीस काढून कारवाई केली होती. १५० घरांपैकी २० घरे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकली होती. संबंधित अधिकाऱ्यांबरोबर किसान सभेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली असता, ती घरे पुन्हा बांधून देऊ, असे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच यापुढे अशी कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वस्त केले. या वेळी मागण्या पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, इनक्लाब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे, किसान सभा राज्य सेक्रेटरी कॉ. डॉ. अजित नवले, किसान सभा राज्य उपाध्यक्ष कॉ. किसन गुजर, माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. किरण गहला, डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले, जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव कॉ. प्राची हातविलेकर, कॉ. चंदू धांगडा, कॉ. चंद्रकांत घोरखना, कॉ. हर्षल लोखंडे, कॉ. सुनील सुर्वे व जिल्हा, तालुका कमिटीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com