कांदरवाडीच्या विद्यार्थ्यांना सायकल भेट

कांदरवाडीच्या विद्यार्थ्यांना सायकल भेट

कासा, ता. १६ (बातमीदार) : जिल्हा परिषद शाळा कांदरवाडी येथे अक्षरधारा फाऊंडेशन व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील माजी विद्यार्थिनींना नवीन पंजाबी ड्रेसचे वाटप करून उद्योग करण्याकरिता प्रेरित करण्यात आले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती, गावकरी उपस्थित होते. कांदरवाडीतील शाळा ही अत्यंत दुर्गम भागात शाळा असून शाळेतील काही विद्यार्थी दूरवरून पायी चालत येतात. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब व अक्षरधारा फाऊंडेशनने २५ विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या. अक्षरधारा फाऊंडेशनच्या वतीने राकेश शहा, तेजसभाई शाह, तसेच लायन्स क्लबच्या वतीने रितेश मेहता व स्वाती मेहता उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com