चौकांमधील वाहतूक कोंडीवर तोडगा

चौकांमधील वाहतूक कोंडीवर तोडगा

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : वाहतुकाची नेहमीच वर्दळ असलेल्या वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकातील वाहतूक नियमनाच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने जंक्शन बॉक्स ही अभिनव संकल्पना राबवली आहे. या जंक्शन बॉक्सद्वारे वाहतुकीचा प्रवाह नियंत्रित राहणार असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. अशाच प्रकारची जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना वाहतूक नियमनाच्या दृष्टीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राबवण्यात आली आहे. या जंक्शन बॉक्सद्वारे वाहतुकीचा प्रवाह सुयोग्य रीतीने नियंत्रित होणार असून वाहनांची वर्दळ असलेले व्यग्र चौक, क्रॉस रोड्स, टी जंक्शन्स ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यामुळे वाशीतील शिवाजी महाराज चौकात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या या प्रयोगाच्या यशानंतर शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
------------------------------------
वाहनांना थांबण्यास प्रतिबंध
वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ट्रॉफिक सिग्नलसारख्या नियंत्रण व्यवस्था उपलब्ध असूनही अनेकदा चौकांमध्ये कोंडी होण्याचे प्रकार घडतात. त्या ठिकाणी जंक्शन बॉक्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. या जंक्शन बॉक्समध्ये वाहनांना थांबण्यास प्रतिबंध असल्याने नेहमी मोकळे राहिल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते.
-----------------------------------
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक नियमनाच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात जंक्शन बॉक्स तयार केला आहे. शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये ही संकल्पना राबवण्याचे नियोजन आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com