निम्म्या तिकीटदराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निम्म्या तिकीटदराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निम्म्या तिकीटदराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निम्म्या तिकीटदराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : राज्य सरकारने महिला सन्मान योजनेंतर्गत अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरात तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी निम्म्या तिकिटदरात एसटीने प्रवास केला. केवळ महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाखांची भर पडली असून सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापूर विभागात मिळाला आहे. सध्या दररोज सरासरी १४ लाखांपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असून दररोज सरासरी ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने १७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून महिलांनी या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला असून स्वस्त, सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवासाचा नवा पर्याय महिलांना एसटीच्या रूपाने प्राप्त झाला आहे.