किन्हवली व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी विशे

किन्हवली व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी विशे

किन्हवली (बातमीदार) : किन्हवली व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण विशे आणि उपाध्यक्षपदी उमेश भानुशाली यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शहापूर तालुक्यात मिनी तालुका म्हणून ओळख असलेल्या किन्हवली शहराच्या बाजारपेठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिसरात ६० गावे, पाड्यांची बाजारपेठ असलेल्या किन्हवली बाजारपेठेला नवे कार्यकारी मंडळ मिळाले आहे. व्यापारीवर्गाच्या मंगळवारी (ता. १८) झालेल्या बैठकीत बाळकृष्ण विशे यांची अध्यक्षपदी; तर उमेश भानुशाली यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद राहील, नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांबाबत कोणताही गैरसमज राहणार नसून पारदर्शक व्यवहार व व्यापार कसा होईल, याकडे कार्यकारी मंडळाचे अधिक लक्ष राहील, असे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण विशे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com