Sun, Sept 24, 2023

संवर्गातील ११९ कर्मचाऱ्यांची वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती
संवर्गातील ११९ कर्मचाऱ्यांची वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती
Published on : 18 April 2023, 12:42 pm
वसई, ता. १८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे ११९ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी ही पदोन्नती केली आहे. लिपिक, टंकलेखकपदावर काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली नाही, त्यांची दखल घेत आस्थापना विभागामार्फत बढती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, अन्य बाबी व माहिती पडताळल्यानंतर महानगरपालिकेच्या मंजुरी आकृतिबंधानुसार आस्थापनेवरील ११९ पात्र लिपिक, टंकलेखकांची वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती करण्यात आली.