निर्देशांकांची दुसरी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांची दुसरी घसरण
निर्देशांकांची दुसरी घसरण

निर्देशांकांची दुसरी घसरण

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : कोणत्याही ठोस संकेतांच्या अभावी आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सलग दुसरी घसरण नोंदवली. सेन्सेक्स १८३.७४ अंश; तर निफ्टी ४६.७० अंशांनी घसरला.

आज व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेन्सेक्स, निफ्टी नफा दाखवत होते. सेन्सेक्स तर ६०,११३ अशांपर्यंत वर गेला होता; मात्र तेथे तो टिकू शकला नाही, नफावसुलीमुळे तो खाली घसरला व नंतर दिवसभरात तो साठ हजारांचा टप्पा गाठू शकला नाही. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५९,७२७.०१ अंशांवर; तर निफ्टी १७,६६०.१५ अंशांवर स्थिरावला.

आज औषधनिर्मिती कंपन्या आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्राचे शेअर नफ्यात होते. निफ्टीमधील डिव्हिज लॅब तीन टक्के, एच.सी.एल. टेक, सिप्ला आणि इंडसइंड बँक दोन टक्के; तर नेस्ले पावणेदोन टक्के वाढला. निफ्टीमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, अदाणी एंटरप्राइजेस, अपोलो हॉस्पिटल आणि टायटन या शेअरचे भाव एक ते दोन टक्के पडले. सेन्सेक्समधील विप्रो, सन फार्मा, मारुती, एशियन पेंट या शेअरचे भाव अर्धा ते दीड टक्का वाढले; तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, बजाज फायनान्स, महिंद्र आणि महिंद्र, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का घसरले.

...........
चीनचा जीडीपीचा तपशील चांगला असला, तरी शेअर बाजारांना त्यामुळे दिलासा मिळाला नाही. कारण इतर देशांमधील मंदीची चिंता बाजाराला सतावते आहे. आता अमेरिकेतील बँका आणि आयटी कंपन्यांच्या निकालांवर सर्वांचे लक्ष आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्व्हिसेस.