वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक
वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक

वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : ठाण्यात हिंदी सिरीयल, वेबसीरीज, मॉडेलिंगमध्ये काम करणाऱ्या कलाकार मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. यानुसार पोलिस पथकाने पडताळणी करत छापा टाकून एका महिला दलालाला अटक केली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या सर्व महिला छोट्या पडद्यावरील कलाकार आणि मॉडेल असल्याचे उघड झाले आहे. अटकेतील मॉडेल महिला ही हिंदी सिरीयल, वेबसीरीज आणि मॉडेलिंग करणाऱ्या मुलींना पैशांचे आमिष दाखवून वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना ही गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार खातरजमा करीत पोलिस पथकाने सोमवारी (ता. १७) मॉडेल दलाल हिच्याशी संपर्क करीत बोगस ग्राहक पाठवले होते. ग्राहकाला आरोपी महिला दलालाने हॉटेल लीरीडा येथे बोलावले. त्यानुसार शिताफीने सापळा रचून महिला दलाल मॉडेलला अटक केली. तिच्या ताब्यात असलेल्या तीन मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील कलाकार यांची सुटका करण्यात यश मिळाले. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.