नवी मुंबईत प्लास्टिकमुक्तीचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत प्लास्टिकमुक्तीचा नारा
नवी मुंबईत प्लास्टिकमुक्तीचा नारा

नवी मुंबईत प्लास्टिकमुक्तीचा नारा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १९ : ऐरोली येथे कोवेस्ट्रो इंडियाने सामाजिक बांधिलकी जपत कचरा संकलन मोहीम राबवली होती. या वेळी ऐरोलीतील कांदळवनाच्या प्लास्टिक मुक्तीसोबतच परिसराच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी सहभागी झाले होते.
युनायटेड वे मुंबई सामाजिक संस्था आणि कोव्हेस्ट्रो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली. या वेळी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत उपायांच्या दिशेने देशाने पुढाकार घेतल्याने त्यात कंपनीकडून योगदान म्हणून हा उपक्रम केल्याचे मत कोवेस्ट्रो (इंडिया)च्या सीएसआरप्रमुख कविता देसाई यांनी सांगितले. या वेळी कंपनीकडून नवी मुंबई, ग्रेटर नोएडा, कुड्डालोर आणि अंकलेश्वर या चार शहरांमध्ये एकाच वेळी कचरा संकलनाची मोहीम यशस्वीपणे राबवली; तर कोवेस्ट्रो (इंडिया) चे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद श्रीनिवासन यांनी पृथ्वीचे संरक्षण करण्याची गरज असल्याची बाब लक्षात घेऊन स्वच्छ शहरासाठी कायम कटिबद्ध असल्याचे त्यांना सांगितले.