चिंचणीतील विकासकामांचे भूमिपूजन

चिंचणीतील विकासकामांचे भूमिपूजन

डहाणू, ता. १९ (बातमीदार) : चिंचणी के. डी. हायस्कूल येथील हुतात्मा स्मारकात तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सीएसआर निधीतून दोन कोटी १३ लाख रुपयांच्या चिंचणीमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १८) करण्यात आले. तारापूर अणूशक्ती केंद्राचे तारापूर महाराष्ट्र स्थळनिर्देशक अनिल देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. या वेळी तारापूर महाराष्ट्र स्थळ सीएसआर फंड अध्यक्ष केदार भावे, चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ, सरपंच नितेश दुबळा, बाबा जोशी, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे, हर्षवर्धन जोशी, भरत बाणे, महेश पाटील, काशिनाथ पाटील, प्रा. संजय घरत, प्रफुल करवीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. चिंचणीत भूमिपूजन झालेल्या दोन कोटी १३ लाखांच्या विकासकामात के. डी. हायस्कूलसमोरील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करणे, समुद्र किनारपट्टीचे व तलावांचे सुशोभीकरण करून बांधकाम करणे, समुद्रकिनाऱ्यालगत दोन शौचालये आणि प्रकाशझोत सिस्टीम बसवणे आदी कामे केली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com