बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका

बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका

नवीन पनवेल, ता. २० (वार्ताहर) : महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे यांच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील बेशिस्त वाहन चालवणाऱ्या ३४,९७२ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये धडक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तीन महिन्यांमध्ये महामार्गावरील अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन, धोकादायक ओव्हरटेक, लेनची शिस्त मोडण्याच्या प्रकारांमुळे अपघातांत वाढ झाली आहे. महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणामध्ये घट होण्याकरिता महामार्गावरील नेमून दिलेल्या विहित मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवण्यात येत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कार्यवाहीबरोबरच चालकांचे प्रबोधन करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहन चालक-मालक, तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने महामार्गावर वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी पार्किंग स्थळे, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक्स परिसर खालापूर टोलनाका येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत.
------------------------------------------
वेग मर्यादेच्या उल्लंघनावर ‘वॅाच’
महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे यांच्या रस्ता सुरक्षा अभियान २०२३ च्या दरम्यान जनजागृतीपर राबवण्यात आलेल्या मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे. महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन महिन्यांत प्राणांतिक व गंभीर अपघातांमध्ये लाक्षणिक घट झाली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लावण्यात आलेल्या स्पीड कॅमेरा, तसेच इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगनद्वारे वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या २७,०७० वाहनांवर कारवाई केली आहे.
---------------------------------------
महामार्ग पोलिस केंद्राकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच वाहनचालकांचे केलेल्या प्रबोधनामुळे पळस्पे हद्दीत अपघातांमध्ये घट झाली आहे.
- गणेश बुरकुल, पोलिस उपनिरीक्षक, महामार्ग पोलिस केंद्र, पळस्पे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com