डंबरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डंबरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : दुचाकीला डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१८) रात्री घडली. हा दुचाकीस्वार तुर्भे एमआयडीसीतून कोपरखैरणे येथे जात होता. एमआयडीसी पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातातील मृत तरुणाचे नाव करण शंकर सावले (वय २०) असे असून तो कोपरखैरणे सेक्टर -७ मध्ये राहण्यास होता. तो माथाडी बदली कामगार म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री करण सावले हा कामानिमित्त तुर्भे एमआयडीसीत गेला होता. त्यानंतर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तो आपल्या मोटारसायकलवरून इंदिरानगर मार्गे कोपरखैरणे येथे जात होता. करणची मोटारसायकल इंदिरा नगर सर्कलकडून गणपतीपाड्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्याला धडक दिली. यात करण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर चालक संजय सपाटे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक जयदीप दळवी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com