तुटलेल्या झाकणांमुळे अपघाताचा धोका

तुटलेल्या झाकणांमुळे अपघाताचा धोका

जुईनगर, ता.२० (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात सध्या नालेसफाईची कामे केली जात आहेत. यासाठी अनेक ठिकाणी गटारांवरील झाकणे काढण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने गटारांवरील उघड्या झाकणांमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नेरुळ एलपीच्या लगत असलेल्या रिक्षा स्टँडजवळ तसेच सानपाडा येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातील गटारांची झाकणे उघडी असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या मार्गावर वयोवृद्ध व्यक्तींचा वावर असल्याने नजर चुकीने पाय पडला तर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. एकीकडे नवी मुंबई शहराचे सुशोभीकरण होत असताना दुसरीकडे अनेक विभागांमध्ये गटारांची झाकणे उघडी असल्यामुळे त्याचा नाहक त्रास रहिवाशांना होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com