मृत्युंजय देवदूतांनी वाचवले कंटेनर चालकाचे प्राण

मृत्युंजय देवदूतांनी वाचवले कंटेनर चालकाचे प्राण

मुरबाड, ता. २० (बातमीदार) : मुरबाड-कल्याण रस्त्यावर बुधवारी (ता. १९) रात्री मुरबाडी नदीवरील धानिवली पुलाच्या मधोमध एका गॅस कंटेनरचा अपघात झाला होता. त्यामध्ये अडकलेल्या जखमी अवस्थेतील चालकाची धानिवली आणि देवगाव येथील मृत्युंजय देवदूत यांनी सुटका केली.

मुरबाड-कल्याण रस्त्यावर धानिवली पुलाच्या मधोमध बुधवारी दहाच्या सुमारास अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे दोन्ही पाय अडकल्याने त्याला बाहेर येता येत नव्हते. कल्याणकडून येणाऱ्या गाड्या धानिवलीमार्गे वळवण्यात आल्या व कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या डॅममार्गे पाठवण्यात आल्या. अपघाताची माहिती मिळताच धानिवली, देवगावचे मृत्युंजय देवदूत कामाला लागले. मृत्युंजय देवदूत अविनाश भोईर यांनी चालकाचे दोन्ही पाय मोकळे करून त्याला बाहेर काढले आणि दवाखान्यात उपचारासाठी तत्काळ पाठवले. या कामी नितीन राणे, पवन राणे, काशिनाथ आहिरे, गणेश तुपे, विजय भोईर यांनी मदत केली. शेवटी तीन क्रेनच्या माध्यमातून रात्री बाराच्या सुमारास कंटेनर बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com