जातवैधता प्रमाणपत्रासाठी १ मेपर्यंत मोहीम

जातवैधता प्रमाणपत्रासाठी १ मेपर्यंत मोहीम

पालघर, ता. २० (बातमीदार) : २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे आरक्षित जागेवर प्रवेश देण्यात येतो. यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जातवैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये, यासाठी १ एप्रिल ते १ मे या कालावधीत विशेष मोहीम राबवली जात आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. पालघर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी १० एप्रिलपूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत; परंतु अद्याप जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जातीच्या संदर्भातील वडिलांकडील नातेवाईकांचे मानीव दिनांकापूर्वीचे कागदपत्र व नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे मूळ व साक्षांकित छायाप्रतींसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात समक्ष उपस्थित रहावे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विशाल नाईक यांनी कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com