Sat, Sept 23, 2023

अनिता पाटील यांचे निधन
अनिता पाटील यांचे निधन
Published on : 20 April 2023, 10:47 am
विरार, ता. २० (बातमीदार) : विवा महाविद्यालयाचे विश्वस्त संजीव पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील (वय ६३) यांचे गुरुवारी (ता. २०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांच्या त्या वाहिनी होत. अनिता पाटील या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतून अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. उत्तम कॅरमपटू अशी त्यांची ओळख होती. त्यांच्यावर गुरुवारी विरार पश्चिमेकडील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.