तिकीटाच्या काळाबाजारावर कारवाई

तिकीटाच्या काळाबाजारावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : मेल-एक्स्प्रेसमध्ये कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी दलाल प्रवाशांकडून जादा पैसे घेतात. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या या दलालांवर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. या कारवाईत सहा विभागांमध्ये संशयास्पद ठिकाणी छापे टाकून ४९ दलालांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २६.७० लाख रुपयांची १,०८८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष अभियान हाती घेतले होते. या अभियानात आरपीएफ गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विभागीय रेल्वे अधिकारी यांची टीम गठीत करण्यात आली होती. तिकीट तपासणी अभियानात निदर्शनास आले की, अनेक प्रवासी बोगस ओळखपत्रांचा वापर करून रेल्वे तिकिटांचे आरक्षण करतात. ज्यात बऱ्याच आयआरसीटीसी दलालांचा समावेश होता. आरक्षित रेल्वे तिकीट काढण्यासाठी बोगस ओळखपत्रे आणि सॉफ्टवेअरचा वापर करून प्रवाशांकडून तिकिटांसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात होते. पश्चिम रेल्वेने २,०२२ बेकायदेशीर दलाली करणाऱ्या ७६९ आरोपींना अटक केली असून ६२९ प्रकरणांमध्ये ३२.६३ कोटी एवढी रक्कम वसूल केली आहे.
.....
एप्रिल महिन्याच्या अवघ्या १५ दिवसांत पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने विशेष मोहिमेद्वारे बेकायदेशीर दलालीची ४६ प्रकरणे शोधून काढली आहेत. यामध्ये ४९ जणांना अटक करण्यात आली असून १,०८८ प्रवासाची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ज्यात सुमारे २६.७० लाख किमतीच्या ई-तिकिटांचा समावेश आहे. तसेच रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com