कल्याण-डोंबिवलीत एकाचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १६६ रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक ७३ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आता सक्रिय रुग्णांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे; तर निम्म्याहून अधिक सक्रिय रुग्ण पालिका हद्दीत असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या रुग्ण संख्येने सक्रिय रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. ती संख्या आता ९९८ इतकी झाली आहे. पालिका हद्दीत नोंदवलेल्या ७२ नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्ण संख्या ४८७ वर गेली आहे. म्हणजे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण पालिका हद्दीत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कल्याण-डोंबिवली येथे सात रुग्ण सापडले असून, सक्रिय रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. नवी मुंबईत ५५ रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णसंख्या २७७ इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे १६ रुग्ण नोंदवले गेले असून, सक्रिय रुग्णसंख्या ४९ झाली आहे. भिवंडीत दोन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्ण संख्या १४ आहे. मिरा-भाईंदर येथे नऊ रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्ण संख्या ७२ झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण सापडल्याने सक्रिय रुग्ण ही ३९ झाली असल्‍याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com