राज्य उत्पादन शुल्क विक्रमी वसुली

राज्य उत्पादन शुल्क विक्रमी वसुली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने महसुली उत्पन्नात मोठी म्हणजे सुमारे ३१ कोटींची अतिरिक्त वसुली केली. त्यामुळे एकूण महसुली उत्पन्नाचा आकडा ३२५ कोटींवर पोहोचला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आणि आतापर्यंतची ही ठाणे विभागाची विक्रमी वसुली असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) कोरोनाचा प्रादुर्भाव होता. मात्र याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने दिलेल्या उद्दिष्ट पेक्षा अधिक महसूल जमा केला होता. ठाणे विभागाने २९५.४७ कोटी रुपयांची तेव्हा महसूल वसुल केला होता. याचदरम्यान कोरोनात घातलेले निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारचा महसुल कसा वाढेल या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली होती. २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याला सुमारे २१ हजार ५०० कोटींचा महसूल जमा करण्यात यश आले. याकरिता विभागाच्या प्रत्येक कार्यालयाने जास्तीत जास्त भरीव कामगिरी करण्यावर विशेष भर दिला. यामध्ये ठाणे विभागाने त्या आर्थिक वर्षात सुमारे ३२५.५३ कोटी रुपये जमा केले. हे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी दारूची दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून आपल्या राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क (आयात शुल्क), परवाना दुसऱ्या जागी स्थलांतर करणे (विशेष अधिकार शुल्क) अशा विविध मार्गांवर जोर टाकल्याने या वर्षात ३० कोटी ६० लाखांचा अधिक महसूल वाढविण्यात यश आले आहे.
..................................
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाना अखेरच्या दिवसात चांगलेच यश आले. १५ मार्चपर्यंत १७५ कोटींची वसूल पूर्ण झाली होती. पण ती महसुली वसुली ३२५ कोटीवर पोहोचली. योग्य आखणी आणि केलेले प्रयत्न हेच महसुली उत्पन्न वाढण्याचे प्रमुख कारण ठरले आहे.
- डॉ. निलेश सांगडे, अधीक्षक, ठाणे विभाग,राज्य उत्पादन शुल्क

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com