
मध्य रेल्वेच्या १८ उन्हाळी विशेष गाड्या
मुंबई, ता. २१ : मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणखी १८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई ते सुभेदारगंजदरम्यान धावणार आहेत. ट्रेन क्र. ०४११६ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून ५ मे २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत दर शुक्रवारी रात्री १२.१५ ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१० ला सुभेदारगंजला पोहोचेल. ट्रेन क्र. ०४११५ साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुभेदारगंज येथून ३ मे २०२३ ते २८ जून २०२३ या कालावधीत दर बुधवारी सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.१५ ला एलटीटीला पोहोचेल. या दोन्ही विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रंगौल, भरुसुमेरपूर, कानपूर सेंट्रल आणि फतेहपूर स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उद्यापासून (ता. २२) सुरू होणार आहे.