मुलुंड अग्निशमन दलामध्ये नवीन विशेष अग्निविमोचन वाहन दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंड अग्निशमन दलामध्ये नवीन विशेष अग्निविमोचन वाहन दाखल
मुलुंड अग्निशमन दलामध्ये नवीन विशेष अग्निविमोचन वाहन दाखल

मुलुंड अग्निशमन दलामध्ये नवीन विशेष अग्निविमोचन वाहन दाखल

sakal_logo
By

टॉवरमधील आग विझवणारे
वाहन मुलुंडच्या दलात दाखल
मुलुंड, ता. २२ (बातमीदार) ः अग्निशमन सेवा दिनाच्या पूर्वसंध्येला मुलुंड केंद्राच्या ताफ्यात एक विशेष वाहन दाखल झाले आहे. ६४ मीटर उंच इमारतीतील आग विझवू शकणारे ‘टीटीएल-६४’ वाहन दाखल झाल्याने मुलुंड केंद्र अधिक सक्षम झाले आहे.
नवीन अग्निशमन वाहनाची माहिती देताना मुलुंड दलाचे वरिष्ठ केंद्र अधिकारी डी. एम. पाटील म्हणाले, की मुलुंडमध्ये अनेक गगनचुंबी इमारती आहेत. आजतागायत मुलुंडमध्ये आतापर्यंत फक्त १२ ते १३ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणारे एएलपी-४२ अग्निशमन वाहन ताफ्यात आहे. त्यात आता नव्या वाहनाची भर पडली आहे.
सध्या शहरात आगीच्या घटना मोठी समस्या बनली आहे. उंच इमारतींच्या आगी रोखण्यासाठी फिक्स फायर फायटिंग सिस्टीम सतत कार्यान्वित असणे अपेक्षित आहे. काही वेळा ती कार्यरत नसल्याने उंच इमारतींमध्ये लागलेली आग रौद्ररूप धारण करते. परिणामी जीवित आणि वित्तहानी वाढते. म्हणूनच मुलुंड परिसरातील उंच इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता तेथील मोठ्या आगींवर मात करण्यासाठी मुलुंड अग्निशमन दलात ६४ मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणारे नवीन अग्निशमन वाहन दाखल झाले आहे.
नवीन अग्निशमन वाहनामुळे गगनचुंबी इमारतींमधील आग विझवण्यास मदत मिळेल, असे डी. एम. पाटील यांनी सांगितले.