वज्रेश्वरी देवी पालखी सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वज्रेश्वरी देवी पालखी सोहळा उत्साहात
वज्रेश्वरी देवी पालखी सोहळा उत्साहात

वज्रेश्वरी देवी पालखी सोहळा उत्साहात

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : ढोल ताशाच्या गजरात व फटाकेच्या अतिशबाजीत देवीच्या जयघोषत वज्रेश्वरी देवीची पालखी मिरवणूक मोठा थाटामाटात पार पडला. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी योगिनी देवीच्या यात्रोत्सव बुधवारपासून सुरू होता. या यात्रोत्सवात ठाणे, पालघरसह मुंबई आणि गुजरात राज्यातून लाखोंच्या संखेने भविकांनी गर्दी केली होती. या यात्रोत्सव दरम्यान वज्रेश्वरी संस्थानचे विश्वस्त तसेच वज्रेश्वरी ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक तुषार पाटील यांच्यासह येथील कर्मचारी वृंदने यात्रा उत्साहात पार पडावी, यासाठी अथक परिश्रम घेतले. तसेच गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला देवीचा पालखी सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. चैत्र अमवस्याला रात्री १२ वाजेच्या सुमारास ढोल ताशा आणि टाळ मृदुंगच्या गजरात वज्रेश्वरी मंदिरातून देवींची पालखी खाली उतवण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी भविकांनी मोठी गर्दी केली होती.
.....
वज्रेश्वरी : वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.