
वाड्यात ईद उत्साहात साजरी
वाडा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यात शनिवारी (ता. २२) रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिमांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सण साजरा केला. तालुक्यातील वाडा, खानिवली, कुडूस, वडवली व नारे या मुस्लिम लोकवस्ती असलेल्या गावात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी सकाळी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. हिंदूंनीही मुस्लिमांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत सणाचा आनंद घेतला. कुडूस येथील व्यावसायिक सन्मान पटेल यांचा सात वर्षीय मुलगा अब्दुल्ला पटेल यांनी २९ दिवस रोजा केल्याने त्याचे कौतुक करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, अशोक पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास जाधव, चिंचघरचे उपसरपंच मनेश पाटील, बबन नांगरे, सचिन जाधव, नितीन जाधव यांनी मुस्लिम समाजाचे नेते मुस्तफा मेमन, इरफान सुसे यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.