Thur, Sept 28, 2023

प्रभादेवीत रंगला खेळ पैठणीचा
प्रभादेवीत रंगला खेळ पैठणीचा
Published on : 22 April 2023, 2:40 am
प्रभादेवीत रंगला ‘खेळ पैठणीचा’
प्रभादेवी (बातमीदार) : आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त कामातून महिलाना विरंगुळा मिळण्याच्या हेतूने प्रभादेवीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणी’च्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभादेवीतील निर्मिती सोसायटीत महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा आणि पैठणीचा खेळ घेण्यात आला. विविध भाषा अवगत असलेल्या आठ वर्षांच्या आभा घारपूरकर हिने मराठी आणि तेलगू भाषेत सुमधुर गाणी गाऊन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. सिद्धाई वालावलकर हिने सुंदर पोवाड्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.