Thur, Sept 28, 2023

समीर ठाकूर युवा सेना समन्वयकपदी
समीर ठाकूर युवा सेना समन्वयकपदी
Published on : 22 April 2023, 2:03 am
अलिबाग, ता. २२ : समीर ठाकूर यांची युवा सेने समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे. या निवडीचे पत्र युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी शिवसेना भवन येथे दिले. युवा सेनेच्या रायगड जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अलिबाग येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी अमीर ठाकूर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी तालुकाप्रमुख शंकर गुरव, संदीप पालकर, सतीश पाटील, स्वप्नील पडवळ व शिवसैनिक उपस्थित होते. अमीर उर्फ पिंट्या ठाकूर यांचे संघटन कौशल्य मजबूत असून याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. हे नियुक्तिपत्र स्वीकारल्यानंतर ठाकूर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.