हजारो महिला एकविरा देवीच्या चरणी

हजारो महिला एकविरा देवीच्या चरणी

दिवा, ता. २३ (बातमीदार) : दिवा शहरात शिवसेनेच्या वतीने नुकतेच एकवीरा देवीच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दर्शन सोहळ्यात दिवा शहरातील हजारो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
महिलांसाठी तब्बल ५० बस व अनेक खाजगी गाड्यांची सोय करण्यात आली होती. कार्ला येथे खास महिलांसाठी उभारल्या गेलेल्या भव्य मंडपात क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर सर्व महिलांनी देवीच्या गडावर जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, शहर अधिकारी युवती सेना साक्षी मढवी यांनी सर्व महिलांसोबत गडावर जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर महिलांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. विजेत्या महिलांना सोन्याची नथ, पैठणी व इतर अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशहर प्रमुख गणेश मुंडे, सुनीता मुंडे, माजी नगरसेवक दीपक जाधव, विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, विनोद मढवी, उपविभाग प्रमुख सचिन चौबे, जगदीश भंडारी, राजेश पाटील, सदाशिव पाटील, शरद पाटील, तुकाराम मुंडे, शाखाप्रमुख नीलेश म्हात्रे, गणेश गायकवाड आदींनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com