Tue, October 3, 2023

विक्रमगडमध्ये अखाती सण उत्साहात
विक्रमगडमध्ये अखाती सण उत्साहात
Published on : 23 April 2023, 11:59 am
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील वाकी गावांमध्ये महिलांच्या पुढाकाराने अखाती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते, असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करले तो पापांतून मुक्त होतो, अशी ग्रामीण भागात भावना आहे. या वेळी महिलांनी पारंपरिक गवराईची गाणी गायिली. महिलांनी शोभायात्रा काढून मिरवणूक काढण्यात आली.