अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना तळोजा फेज २ मधून समोर आली आहे. पीडितेच्याच इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी पीडितेची आई आरोपीकडे गेली असता त्याने दोघींनाही शिवीगाळ करत मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
तळोजा फेज २ मध्ये पीडित तरुणी आणि आरोपी राहतात. अल्पवयीन पीडितेची ओळख झाल्यानंतर आरोपी मागील काही दिवसांपासून तिच्याशी अश्लील गप्पा मारत होता. तसेच, तिनेही असे करावे अशी बळजबरी करत होता. आरोपीने मुलीचा विनयभंगदेखील केला. पीडितेने याची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीला जाब विचारला. पण, आरोपीने दोघींना शिवीगाळ करत मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com