बस अपघातात चौघांचा मृत्यू

बस अपघातात चौघांचा मृत्यू

पुणे, ता. २३ : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला रविवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर पुण्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या या अपघातात बसमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला; तर २२ जण जखमी झाले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अपघातग्रस्त बस नीता ट्रॅव्हल्स कंपनीची होती. मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे साखरेची पोती घेऊन जात होता. पोलिस आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा दलाने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाची सात वाहने एकापाठोपाठ दाखल झाली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसच्या मागील बाजूची काच फोडून जखमींना बाहेर काढले. या अपघातामुळे पुणे-बंगळूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर त्याच ठिकाणी आणखी दोन किरकोळ अपघात झाले.
...
खासदार सुळेंकडून विचारपूस
खासदार सुप्रिया सुळे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. नवले पूल आणि लगतचा धोकादायक भाग सुरक्षित बनवावा, यासाठी लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
मृतांची नावे
रवींद्र वासुदेव कोरगावकर, सुवर्णा वासुदेव कोरगावकर (वय अनुक्रमे ४६, ८३; दोघे रा. दाजीपुरा, ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर), निशा प्रमोद भास्कर (वय ३६, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर), अरुण गोपीनाथ सावंत (वय ५४, रा. मारुती पवार चाळ, मराठा कोळसेवाडी, कल्याण पूर्व, मुंबई), संजय सोनू गवळी (वय ३७, रा. मोरिवली पाडा, ठाणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com