आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप

आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप

कासा, ता. २४ (बातमीदार) : अक्षय्य तृतीया व परशुराम जयंतीचे औचित्य साधून डहाणू तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. परशुराम एवम सामळनाथ सेवा समिती बोरिवलीचे उद्योजक राजेशभाय त्रिवेदी, संगीताबेन त्रिवेदी, मुकेश त्रिवेदी, विजयभाय पटेल व वर्षाबेन पटेल यांच्या हस्ते व शिव छत्रपती समाज सेवा मंडळ जूचंद्र यांच्या सौजन्याने हे साहित्य वाटप करण्यात आले. डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत किन्हवलीमधील खोरीपाडा, पाटिलपाडा, डुंगीपाडा, साबरपाडा, खुमारपाडा व कांहडोळपाडा तसेच ग्रुप ग्रामपंचायत सायवन -बाजारपाडा कातकरी वस्तीतील ६०० आदिवासी गरजू कुटुंबाना धान्य, संसारपयोगी साहित्य, लहान मुलांना बिस्कीट पुडे व कॅडबरीचे वाटप करण्यात आले. धान्य वाटप कार्यक्रमाला शिव छत्रपती मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, सदस्य किरण म्हात्रे, हरेश भोईर, मेघनाथ पाटील, मिलिंद पाटील, उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीताराम पांडुरंग भोये, अंगणवाडी ताई, आशा सेविकांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com