वसई बद्रीनाथ मंदिरात रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई बद्रीनाथ मंदिरात रक्तदान शिबिर
वसई बद्रीनाथ मंदिरात रक्तदान शिबिर

वसई बद्रीनाथ मंदिरात रक्तदान शिबिर

sakal_logo
By

वसई, ता. २४ (बातमीदार) : उत्तरांचल मित्र मंडळ वसई व पालघर मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने वसई पश्चिम सनसिटी येथील भगवान बद्रिनाथ मंदिर संकुलात रक्तदान व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ५२ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. या वेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिबिरात मोफत नेत्र व विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यासाठी साथिया रक्तपेढीचे सहकार्य लाभले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष माधवानंद भट्ट, होशियार सिंह दसोनी, माजी महापौर नारायण मानकर, समाजसेवक अनिल गलगली, समाधान फाऊंडेशनचे अविनाश कुशे, वसई-विरार मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, संदेश जाधव, उपनिरीक्षक अभिजीत मडके, रुग्ण मित्र राजेंद्र ढगे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.