५० हजारांचा गुटख्याचा साठा जप्त

५० हजारांचा गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : दुचाकीवरून गुटख्याचा साठा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सोमवारी (ता. २४) अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गुटखा व दुचाकी जप्त करण्यात आली. शिवशंकर शर्मा (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास एनआरआय पोलिस करत आहे.

उलवे सेक्टर-२ मधील आनंद दिघे चौकात एक व्यक्ती दुचाकीवरून सुगंधी पान मसाला, गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांची अवैधरीत्या विक्री करत असल्याची माहिती एनआरआय पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक अंकुश शेलार व अमलदारांनी तात्काळ उलवे सेक्टर -२ मध्ये धाव घेतली. यावेळी आनंद दिघे चौकात शिवशंकर शर्मा हा आपल्या दुचाकीवर काळ्या रंगाच्या मोठ्या बागेसह आढळून आला. पोलिसांनी त्याची दुचाकी अडवून त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता सदर बॅगेत सुमारे ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी शिवशंकर शर्मा याच्याजवळ सापडलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com