कल्याण पूर्वेतील रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा हालचाली सुरू

कल्याण पूर्वेतील रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा हालचाली सुरू

कल्याण, ता. २४ (बातमीदार) : कल्याण पूर्व मधील सिद्धार्थ नगर ते काटेमानेवली व्हाया तिसगाव नाका ते सिद्धार्थ नगर यू टाइप रस्ता रुंदीकरणबाबत केडीएमसीने हालचाली सुरू केल्या आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी बाधितांचे पूनर्वसन करावे, नंतर रस्ता रुंदीकरण निर्णय घ्या, असा पवित्रा येथील स्थानिक व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे पुन्हा येथील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कल्याण पूर्व मधील यू टाइप रस्त्याबाबत केडीएमसीने जाहिरात प्रसिद्ध करत त्या रस्त्याचे रुंदीकरण साठी हालचाली सुरू केल्या आहेत. केडीएमसीच्या मंजूर विकास योजनेतील सेक्टर क्र. १ ते ४ च्या विकास योजनमध्ये काटेमानिवली नाका ते पोटे अपाटमेंट पर्यंत १२ मीटर रुंद रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. तर त्या तिसगांव नाक्यापर्यंत १५ मीटर रुंद असा (यु टाईप) रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणारा रहदारीचा वाहतुकीचा एकमेव रस्ता असून कल्याण पूर्वेकडील वाढती लोकसंख्या तसेच पुणे लिंकरोडच्या पलिकडील विकसित होणारे क्षेत्र विचारात घेता हा रस्ता (यू टाईप) किमान २४ मीटर प्रस्तावित केल्यास कल्याण पूर्वेकडील रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. यात अनेक फेरबदल होणार असल्याने नव्याने पुन्हा केडीएमसीने जाहीर सूचना प्रसिद्ध करत नागरिकांकडून हरकती आणि सूचना दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
.....
पुनर्वसन या भागात हवे
आम्ही ४५ वर्षांपासून व्यवसाय करत असून, रस्ता तोडला तर आम्ही कुठे जाणार. रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, पण आमचे पूनर्वसन आमचे येथेच करा, अशी मागणी येथील व्यापारी दुर्गेश फडोळ यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com