शिवसेना पालघर जिल्हाप्रमुखपदी कुंदन संखे

शिवसेना पालघर जिल्हाप्रमुखपदी कुंदन संखे

बोईसर, ता. २५ (बातमीदार) : जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कुंदन संखे यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे कुंदन संखे यांची पालघर-डहाणू शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर सध्या जिल्हाप्रमुख असलेले राजेश शहा यांची उपनेतेपदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत दोघांनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली. कुंदन संखे यांच्यावर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करुन यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com