Tue, Sept 26, 2023

दिवावासियांनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन
दिवावासियांनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन
Published on : 25 April 2023, 11:54 am
दिवा, ता. २५ (बातमीदार) : दिव्यातील पाच हजारांहून अधिक महिला, पुरुषांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले. माजी नगरसेवक व शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. दिवा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत देवदर्शन सामूहिक पद्धतीने घेता यावे, नागरिकांमध्ये बंधुभाव वाढवा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले. दिव्यातून सर्व देवी भक्तांना एकवीरा देवीच्या दर्शनासाठी १०८ विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. हा संपूर्ण देवदर्शन सोहळा नागरिकांना मोफत होता. शैलेश पाटील यांनी आयोजित केलेल्या एकवीरा देवी दर्शन सोहळ्यात दिव्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.