वसई-विरार शहरात कोरोनाचे ४३ रुग्ण

वसई-विरार शहरात कोरोनाचे ४३ रुग्ण

वसई, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या महापालिका क्षेत्रात दररोज बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना फैलाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या महापालिका क्षेत्रात ४३ रुग्ण कोरोनाव उपचार घेत आहेत.
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बाधितांमध्ये खोकला, ताप व अन्य लक्षणे आढळत आहेत.
शहरात २१ एप्रिलला ३२ उपचार घेत असलेले रुग्ण होते. मात्र २२ एप्रिल रोजी शहरामध्ये १५ नवे बाधित आढळून आले होते. तर उपचार घेणाऱ्यांची संख्या हा ४४ इतकी झाली होती. त्यानंतर सोमवारी तीन रुग्ण आढळल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ४३ इतकी झाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी जर कोरोना बाधित वावरत असेल तर त्याच्यामुळे हा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी मास्क परिधान केल्यास यापासून दूर राहता येईल. एकीकडे महापालिका क्षेत्रात रोज कोरोनाने नागरिक बाधित होत असताना देखील नागरिक काळजी घेताना दिसत नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेने सर्व रुग्णालय, आरोग्य केंद्रात कोरोना बाबत लक्षणे आढळली तर चाचणी, निदान करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. आरोग्य विभाग कोरोना बाधितांना कोणती औषधे घ्यावीत, काय काळजी कशी घ्यावी यासंबंधी पूर्णपणे माहिती देत आहेत.
कोरोना त्रिसुत्री पाळा
वसई विरार शहर हे दाटीवाटीचे असून सार्वजनिक ठिकाणी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याचबरोबर मुंबई व आजूबाजूच्या ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी देखील ये जा करत असतात. त्यामुळे मास्क घालणे, घरी गेल्यावर स्वच्छ हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे याकडे लक्ष देण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com