अंमली पदार्थांचे सेवन; दोन जणांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंमली पदार्थांचे सेवन; दोन जणांवर कारवाई
अंमली पदार्थांचे सेवन; दोन जणांवर कारवाई

अंमली पदार्थांचे सेवन; दोन जणांवर कारवाई

sakal_logo
By

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : भिवंडीचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या आदेशानुसार सर्व पोलिस ठाण्यांमार्फत अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार अंमली पदार्थ गांजाचे सेवन केल्याप्रकरणी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शांतीनगर पोलिसांनी मेहंदी हसन नबी हसन अन्सारी (३५ रा.चव्हाण कॉलनी, भिवंडी) यास चव्हाण कॉलनीतील मोकळ्या मैदानात गांजाच्या सेवन करताना अटक केली. तसेच निजामपूरा पोलिसांनी नदिनाका येथील गणेशघाटा जवळील मोकळ्या जागेत चांदवली अयुब शेख (३३ रा.अमिनाबाग,नदिनाका) याला गांजा ओढताना पकडून ताब्यात घेऊन अटक केली आहे.