भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतांच्या आवारात आग

भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतांच्या आवारात आग

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : शहरातील ठाणगे आळी येथील मीनाताई ठाकरे रंगायतनचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाइ रंगायतनच्या इमारतीबाहेर काढलेल्या भंगाराला मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे विद्युत उपकरणाच्या केबल जळाल्याने परिसरातील सुमारे पाच तास वीज बंद होती.
भिवंडी महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रंगायतांच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. यासाठी ठेकेदाराने रंगायतन मधील खुर्च्यांसह इतर नादुरुस्त फर्निचर रंगायतनच्या आवारात उघड्यावर ठेवले होते. रंगायतनच्या मूळ प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फर्निचरला आग लागली. ही आग पसरल्याने त्याखाली असलेल्या गोळ्यांची पाकिटे आणि औषधाच्या बाटल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या रंगायतन मधील पहिल्या मजल्यावर इदगारोड प्राथमिक आरोग्य केंद्र व बिजीपी दवाखाना सुरु होता तर तळमजल्यावर कोविड उपचार केंद्र सुरु आहे. त्यामुळे या विभागातून हा औषधांचा साठा कचऱ्यात टाकला गेला असावा,असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणाच्या केबल जळाल्याने स्थानिक टोरेंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्याने ऐन सकाळच्या वेळी नागरिकांना विविध असुविधांचा सामना करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com