डहाणू पंचायत समितीवर शिक्षण हक्क मोर्चा

डहाणू पंचायत समितीवर शिक्षण हक्क मोर्चा

डहाणू, ता. २५ (बातमीदार) डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीवर घसरला आहे. विद्यार्थ्यांना नीट लिहिता वाचता ही येत नाही. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाले असून त्यात शिक्षण विभाग पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. त्यासाठी संपूर्ण तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध मागण्यांकरिता डहाणू पंचायत समितीवर आदिवासी भागातील हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांनी कष्टकरी संघटनेमार्फत ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण हक्क मोर्चा काढला होता.

मंगळवारी (ता. २५) कष्टकरी संघटनेने ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली डहाणू के. टी. नगर ते डहाणू पंचायत समितीपर्यंत काढलेल्या शिक्षण हक्क मोर्चात ॲड. पीटर प्रभू, शिराज बलसारा, मधुबाई, रघुनाथ सुतार, सुनील मलावकर, रवी धांगडा, कलावती वळवी आदींच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना मागणीचे निवेदन सादर केले. डहाणू तालुक्यात ४६० प्राथमिक शाळांसाठी ४४ हजार विद्यार्थ्यांकरीता एक हजार ७४९ शिक्षकांची आवश्यकता आहे. असे असताना केवळ एक हजार २६७ शिक्षक पदे कार्यरत आहेत. ४७२ शिक्षक पदे रिक्त असताना येत्या शैक्षणिक वर्षात डहाणूत फक्त ३० शिक्षक येणार असल्याने एकूण ६७३ शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. फक्त एक हजार ७३ शिक्षक कार्यरत राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होणार आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, अन्यथा कष्टकरी संघटना आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com