अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

चेंबूर ता. २५ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. साजिद अली हैदर शेख (वय ३२) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यातील आरोपी रिक्षाचालक असून तो चिता कॅम्पमधील बी सेक्टर येथे राहातो तर फिर्यादी ही याच परिसरात राहते. फिर्यादीने तिची लहान मुलगी (वय ९) हिला १२ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चित्ता कॅम्प मधील आईडियल स्कूल जवळ एका अनोळखी व्यक्तीने सार्वजनिक शौचालयात घेऊन जात लगट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यावेळी मुलगी घाबरून ती त्या ठिकाणाहून पळून आली. त्यानंतर फिर्यादी या तात्काळ पोलिस ठाण्यात आले याबाबत महिला पोलिस अधिकारी यांचे समक्ष फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचे सीसी टीव्ही फूटेजची पाहणी करून संशयित आरोपी सादिक शेख गुन्ह्यात अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com