Mon, Sept 25, 2023

कराटे स्पर्धेत जुळी भावंडे विजयी
कराटे स्पर्धेत जुळी भावंडे विजयी
Published on : 26 April 2023, 12:05 pm
उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या शालेय कराटे स्पर्धेत जुळी भावंडे विजयी ठरली. पालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उपायुक्त क्रीडा प्रियंका राजपूत, क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी यांनी महानगरपालिकेच्या वतीने १४ व १७ वयोगटातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींकरिता कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात झुलेलाल ट्रस्ट शाळेचे जुळे भावंडे असलेले विद्यार्थी यश प्रमोद माने व दक्ष प्रमोद माने विजयी ठरले आहेत. त्यांना महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले असून शिवसेनेचे उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.