Tue, Sept 26, 2023

भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश
Mumbai News : भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश
Published on : 26 April 2023, 1:01 pm
खर्डी : भाजप युवा मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश घेतला. या वेळी भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस शशांक हरड, शहापूर तालुका उपाध्यक्ष तेजस पडवळ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, खरिवलीच्या सरपंच नीता वातेस,
उपसरपंच शिवानी हरड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आणि समर्थकांसह शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला. या वेळी भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, उपनेत्या ज्योती ठाकरे, तालुकाप्रमुख कुलदीप (बाळा) धानके, विस्तारक गणेश राऊत, सचिव रवींद्र लकडे, उपतालुका प्रमुख सुनील भेरे, शाखाप्रमुख बाळा निमसे, प्रशांत खर्डीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.