रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

किन्हवली, ता. २६ (बातमीदार) : रानात चरायला सोडलेली गुरे आणायला गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला असून त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. शेजारीच कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी जखमी शेतकऱ्याला दवाखान्यात आणून उपचार केले. त्यास शासकीय स्तरावर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
किन्हवली येथील मौजे शिवाजीनगरमधील शेतकरी सुभाष जयराम पतंगराव हा शेतकरी बुधवारी सकाळी चिखलगाव हद्दीतील रानातून आपली गुरे घेऊन येत असताना समोरून येणाऱ्या रानडुकराने हल्ला करत जोरात धडक देऊन जमिनीवर आपटले. या वेळी डाव्या पायाच्या मांडीला गंभीर जखम झाली आहे. शेजारीच रोपवाटिकेत कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक चिंतामण निंबाळकर व नरेश वाघ यांनी जखमी शेतकऱ्यास किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्याच्यावर उपचार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com