अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिरात कृतज्ञता सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिरात कृतज्ञता सोहळा
अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिरात कृतज्ञता सोहळा

अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिरात कृतज्ञता सोहळा

sakal_logo
By

विरार, ता. २६ (बातमीदार) : विरारच्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरातील अकरावी १९७३ च्या विद्यार्थ्यांचे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच विद्यामंदिर शाळेत उत्साही वातावरणात मान्यवर शिक्षकांसोबत साजरे झाले. या सोहळ्यात शिक्षक एस. व्ही. जोशी, गुजराथी, सुरेखा पाटील, कल्पना राऊत आदींना गौरवण्यात आले. त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन मौलिक मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांमध्ये सिनेक्षेत्रातील कीर्तिकुमार आहुजा, डिम्पल प्रकाशनच्या नम्रता मुळे, दीपक खेडेकर, विधीज्ञ खलील शेख, अशोक पाटील, विश्वनाथ मेहेर, सुबोध देवरुखकर, उल्हास पाटील, किरण तांबे, अनिल पाटील, दिलीप साळवी, मिलिंद पाटील, मुकुंद संख्ये, सुनील खानिवडेकर, संजय गाळवणकर, पद्मजा पाटील, सरोज चुरी, देवयानी सामंत, संध्या नाचणे, विद्या वर्तक, स्मिता गडकरी, रविकिरण संत, लेखिका नंदिनी देवरुखकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.