कल्याणमध्ये दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन
कल्याणमध्ये दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन

कल्याणमध्ये दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

कल्याण (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे विनामूल्य कृत्रिम पाय (जयपूर फूट) आणि कॅलिपर वाटप शिबिराचे आयोजन रविवारी (ता. ३०) कल्याणमध्ये करण्यात आले आहे. रोटरी दिव्यांग सेंटर, काटकर हॉस्पिटलसमोर, सहजानंद चौक येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. गरजू दिव्यांग व्यक्तींना मापाप्रमाणे जयपूर फूट, कॅलिपर मोफत दिले जातील. रोटरी दिव्यांग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त गरजू दिव्यांगांच्या आयुष्यात आशेची नवीन पहाट आल्याचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य यांनी सांगितले. आटोस इंडिया या माहिती तंत्रज्ञान कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून या शिबिरासाठी आर्थिक साह्य केले आहे. सदर शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणकडून करण्यात आले आहे.