
मोफत कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात
बोईसर, ता. २७ (बातमीदार) : सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळ, सू. क्ष. युवक मंडळ पालघर तालुका पूर्व, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर तपासणी शिबिर पालघर येथील कै. गोविंदराव ठाकूर सभागृह पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी समाजामध्ये कॅन्सरबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. शिबिरामध्ये ६३ जणांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. या वेळी आयोजक संस्थांचे पदाधिकारी मुकेश महाले, विष्णुकांत राऊळ, विजय पाटील, शरद पाटील, विलास पाटील, अनिल पाटील, भालचंद्र पाटील, सुनील शेलार, शिबिर समन्वयक हितेश पाटील, विपुल पाटील, रोहिदास पाटील, करविंद पाटील, दिवाकर पाटील, भूपेश पाटील, गणेश पाटील, वसंत पाटील, भरत पाटील, वैभव पाटील, महिला संघटक दिव्यता पाटील, दीपाली पाटील, जिजाऊचे सहकारी, मंडळाचे अनेक माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस संजय पाटील यांनी केले; तर वैद्यकीय अधिकारी राव यांनी कॅन्सर लसीबाबत माहिती दिली.