ठाण्यातील ४८ पोलिसांना महासंचालक पदक

ठाण्यातील ४८ पोलिसांना महासंचालक पदक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महाराष्ट्र राज्य पोलिस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना २०२२ मधील पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पदकांच्या ८०० जणांच्या यादीमध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयातील तब्बल ४८ जणांचा समावेश आहे. यामध्ये विशेषत: पोलिस उपायुक्त रूपाली खैरमोडे-आंबुरे, दहशतवादविरोधी पथक पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांचाही गौरव केला जाणार आहे.

गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये मुंबईपाठोपाठ ठाणे पोलिसांचा उल्लेख केला जातो. अनेक क्‍लिष्‍ट, थरारक गुन्ह्यांची उकल करताना व दोषींविरोधात ठोस पुरावा जमा करताना गुन्ह्यांचा तपास लावला आहे. विशेषत: कोरोना काळात कर्तव्य चोख बजावत संवेदनशील अशा परिसरातही प्रशंसनीय कामगिरी केली आहे. या कामाची दखल घेण्यात आली असून, राज्य पोलिस दलातील सर्वोच्च असे मानल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांनी कर्तव्यनिष्ठ पोलिसांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पोलिस महासंचालक पदकाचे मानकरी
पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी, योगेश आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे, ममता डिसोझा, संतोष घाटेकर, निवृत्ती कोल्हटकर, राजेश बाबशेट्टी, सहायक पोलिस निरीक्षक महेश जाधव, सुनील तारमळे, राखीव पोलिस उपनिरीक्षक शामकुमार चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, सुभाष तावडे, अनिल थोरात, अबुतालिब शेख, सुनील अहिरे, अविनाश बाबरेकर, सत्यवान सोनावणे, जालिंदर आबनावे, कैलास साबळे, पोलिस हवालदार यशोदा धोडे, नीलम सोनावणे, जानवी जाधव, स्वरगिनी शिंदे, रेखा तायडे, सविता पवार, रवींद्र रावते, विनय सोनावणे, संदीप भांगरे, दिलीप शिंदे, शिवाजी विश्वासराव, विनय पवार, अतुल पाटील, संदीप ढोणे, राजेश कदम, सुनील इथापे, नितीन म्हात्रे, विजय नाईक, हेमंत महाले, काशीनाथ राणे, प्रदीप शिंदे, फिरोज सैय्यद, महेंद्र तानावडे, मिलिंद देसले, ठाणे ग्रामीण-पोलिस निरीक्षक रणवीर बयेस.
--------------------------------
नवी मुंबई पोलिस दलातील १४ जणांना पदक
नवी मुंबई (वार्ताहर) : पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक संजय नाळे, महेश पाटील, संजय चव्हाण, प्रकाश मोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश खांडेकर, प्रदीप वाघ, अविनाश तांबे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बने, सहायक पोलिस हवालदार राजेंद्र भारमल, पोलिस हवालदार जगदीश पाटील, महेश वायकर, विजय पाटील, लक्ष्मण पवार, भानुदास मोठे यांचा समावेश आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे होणाऱ्या पथसंचलनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com